पाच किलो रेशनमुळे भविष्य सुधारणार नाही; प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारला टोला

पाच किलो रेशनमुळे भविष्य सुधारणार नाही; प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारला टोला

5 किलो रेशनमुळे लोकांचे, तरुणांचे भविष्य सुधारणार नाही, तुम्ही आत्मनिर्भर बनू शकणार नाही, असा जोरदार टोला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला लगावला. रायबरेलीत राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला त्या संबोधित करत होत्या.

तुम्ही रोजगार आणि रेशन यात काय निवडाल असा सवालही प्रियंका गांधी यांनी केला. अशा प्रकारची धोरणे जो राजकीय पक्ष बनवेल त्यामुळे तुम्ही केवळ निर्भर बनाल, पण आत्मनिर्भर कधीच होऊ शकणार नाही, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. तुम्ही जर तुमच्या पायावर उभे राहू शकत नसाल तर सरकारची नीती धोरणेच चुकीची आहे, हे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे, याकडेही प्रियंका यांनी लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;