महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार कोल्हे यांना विजयी करा, राजेश टोपे यांचे आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार कोल्हे यांना विजयी करा, राजेश टोपे यांचे आवाहन

सध्या सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. नैतिकता तत्वाला गुंडाळले जात आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील भाजप आज राहिली नाही. त्यांचे ऐका मताने सरकार पडले होते. मतदान रूपी शस्त्र मताधिकाराचा वापर करून तेरा तारखेला चुकीचे प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी मतदान करून महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

महाविकास आघाडी खेड तालुका यांचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांचे प्रचारार्थ माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचा संपर्क दौरा व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे बोलत होते. यावेळी राजेश टोपे म्हणाले, खरं जर बघितलं तर 84 वर्षाचे साहेब यांचे पासून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळाली आहे. आपले उमेदवार खासदार अमोल कोल्हे स्वतः डॉक्टर आहेत. ऍक्टर आहेत. आणि संसदरत्न देखील आहेत. ते बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. चांगल्या पद्धतीचे असे व्यक्तिमत्व असून येथील विकास कामांसाठी पुन्हा त्यांना प्रचंड बहुमताने आपल्या भागातून निवडून दिले पाहिजे. अशा पद्धतीची विनंती मी आवर्जून या ठिकाणी करील. ज्यांच्यामध्ये एवढे गुण साठलेले असतात. यापुढील काळात आळंदीचा पाणी प्रश्न निश्चित प्रकारे आम्ही लक्ष देऊन त्यांनाही सांगू आणि सगळे गोष्टी करूनच घेऊ. आळंदी समस्यां मुक्त करण्यात येईल. ही निवडणूक बघितली निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी होत आहे. निष्ठावान लोकांची किंमत आपण करणार का नाही त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरूरचे आमदार निष्ठावान हे सगळे जण काम करीत आहेत. सद्या देशात हुकूमशाही सारखी वाटचाल चालली आहे. हि देशाची निवडणूक असून सर्वानी याचा विचार करून खासदार कोल्हे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

राजेश टोपे म्हणाले, कोणाच्या खात्यात 15 लाख आले का, देशात डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर महाग झाला. खोट्या भूल थापां विसरू नका. देशातील जनतेचा पैसा बँकेत भरला. कर्ज बुडव्यांचे पैसे जनतेच्या करातून बँकेत भरले. त्यातून बँका वाचल्या. ते जीएसटी, इन्कम टॅक्स याच्यातून भरले. शेतकऱ्यांचे पैसे कर्जमाफीचे अनुदानाचे देत नाही. आपल्या प्रत्येकावर दीड लाख रुपये कर्ज डोक्यावर आहे. ज्या देशांमध्ये धार्मिक बाबी काढल्या जातात खऱ्या अर्थाने असं समजायचं की तो देश चुकीचा विचार आणि लोकांचे हातात आहे. यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपले उमेदवार खासदार कोल्हे यांना पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. लोकसभेसाठी सेवा करण्यासाठी माणसाची निवड करायची तुम्हाला निवड करायची आणि त्यामध्ये प्रामाणिक माणसांची निवड केली पाहिजे जे डॉ. खासदार कोल्हे हे प्रामाणिक आहेत. त्यांनी पवार साहेबांना सोडलं नाही. त्यांनी विचारला सोडलं नाही. त्यांनी तडजोड केली नाही. अधिक जास्त वेळ न बोलता मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करेन कोल्हे उमेदवार चांगले आहेत. त्यांना निवडून द्या.

यावेळी काँग्रेसचे डॉक्टर्स सेल अध्यक्ष मनोज राका, नंदकुमार वडगावकर, श्रीधर कुऱ्हाडे, रमेश चौधरी, डॉ. विकास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेशबापू ढमढेरे, मी सेवेकरी फाउंडेशनचे सुधीर मुंगसे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, अमोल पवार, उमेश रानवडे, उत्तम गोगावले, विलास कुऱ्हाडे, बापू कुऱ्हाडे, रमेश गोगावले, आशिष गोगावले, मनोज पवार, शिरूर लोकसभा उपसंघटक अनिता झुजम, नवनाथ वाघमारे, भजनसम्राट कल्याण गायकवाड, बाळासाहेब ठाकूर, मनीषा सांडभोर आदींसह महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजमाला बुट्टे पाटील म्हणाल्या , गद्दारांना गाडल्या शिवाय रहाणार नाही. पवार साहेबांचे एकनिष्ठ व्यक्तिमत्व संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राचे सन्मानासाठी महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. पवार साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मतदान सर्वांनी करावे असे आवाहन बुट्टे यांनी केले. शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार अमोल कोल्हे यांचे प्रचाराचे काम सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे करीत आहेत. महाविकास आघाडी तील विकासाचा महामेरू असून त्यांचे प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मनोगतातून पदाधिकारी यांनी सांगितले.

निष्ठावान खासदार अमोल कोल्हे असून ते त्रिवेणी संगम उमेदवार आहेत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून कामकाज करीत असल्याने असा नेता शिरूर लोकसभेस मिळाला असून खासदार कोल्हे यांना पुन्हा येथील उर्वरित विकास कामासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश बापू ढमढेरे यांनी केले.

शिवसेनेचे नेते उत्तम गोगावले म्हणाले, राज्यातील उद्योग धंदे गुजरात मध्ये जात आहे. यामुळे आपली वज्रमूठ एक आहे तो पर्यंत कोणीही हात लावणार नाही. यासाठी पक्ष फोडण्याचे षंडयंत्र रचण्यात आले. खासदार कोल्हे यांना पुन्हा विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी मोदी हटाव, देश बचाव घोषणा घेत प्रचार यंत्रणेत जोश भरण्यात आला. सुधीर मुंगसे म्हणाले, महाविकास आघाडीने या बैठकीचे आयोजन केले आहे. शिरूर लोकसभेचा विकास करण्यासाठी खासदार कोल्हे यांना पुन्हा निवडून देणे आवश्यक आहे. हि निवडणूक सर्व सामान्य लोकांनी हाती घेतली असून एक ते दिड लाखावर लीड येथून मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यासाठी अधिक जोमाने कार्य करण्यास त्यांनी ग्वाही दिली. यावेळी मराठवाडा मित्र मंडळ पदाधिकारी, शिवसेनेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रमेश गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाचा टक्का का घसरला? पोलिंग बुथवर फिरुन आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा मतदानाचा टक्का का घसरला? पोलिंग बुथवर फिरुन आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक बूथवर जावून पाहणी करत आहेत. या पाहणीत त्यांना...
इतक्या वर्षांत अक्षय कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला..
‘नेता म्हणून माझी निवड केली का?’, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर असं का म्हणाला संजय दत्त?
किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा इतक्या वर्षांनंतर करणार असं काम? चर्चांना उधाण
23 वर्षांत इतका बदलला ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘लड्डू’; ओळखणंच कठीण
शांतिगिरी महाराजांनी EVM कक्षाला हार घातला, गुन्हा दाखल
Lok sabha 2024 : सर्वच पक्षांकडून मुस्लीमांना नकार, 2019 मध्ये 115 तर 2024 मध्ये केवळ 78 जणांना तिकीट