Lok Sabha Election 2024 : अभिनेत्री नेहा शर्माचा रोड शो चर्चेत, वडिलांच्या प्रचारासाठी उतरली मैदानात

Lok Sabha Election 2024 : अभिनेत्री नेहा शर्माचा रोड शो चर्चेत, वडिलांच्या प्रचारासाठी उतरली मैदानात

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या जोरदार सभा आणि प्रचार फेऱ्या सुरू आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता बॉलिवूड अभिनेत्रीही आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. ‘तुम बिन-2’ और ‘क्रुक’ सिनेमांमधून आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री नेहा शर्मा सध्या चर्चेत आहे. नेहा ही वडील अजीत शर्मा यांच्यासाठी बिहारमध्ये रोड शो करत आहे. तिच्या रोड शोला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.

अभिनेत्री नेहा शर्माने इंस्टाग्रामवर हांका, किशनगंज, कटिहार आणि पूर्णियासहित बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचार करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पंजाबी ड्रेसमध्ये दिसतेय आणि वडिलांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial)

या प्रचार फेरी दरम्यान पीरपेंटी आणि कहालगावमध्ये प्रचंड गर्दीने उत्साहात नेहा शर्माचे स्वागत केले. यासंदर्भात नेहा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ”जो कोणी एकदा हृदयात स्थान मिळवतो तो कायमचाच हृदयात राहतो. तुम्ही मला दिलेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने माझे हृदय भरून आले आहे. पीरपेंटी आणि कहालगाव येथे माझे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद”.

एका अन्य व्हिडिओत अभिनेत्री भागलपूरमध्ये आपल्या वडिलांच्या निवडणूक प्रचारासाठी सक्रिय भाग घेताना दिसली. भागलपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार अजीत शर्मा यांच्या विरोधात जेडीयूचे उमेदवार अजय कुमार मंडल यांच्यात मुख्य लढत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;