सोबत या, स्वप्न पूर्ण होतील… मोदी यांची खुली ऑफर; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?

सोबत या, स्वप्न पूर्ण होतील… मोदी यांची खुली ऑफर; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?

आमच्यासोबत या. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, अशी खुली ऑफरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांना दिली आहे. मोदी यांनी जाहीरसभेतून दिलेल्या या ऑफरवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विचार नाही. ज्यांची विचारधारा संसदीय लोकशाही मानत नाही. त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, मोदी यांच्यासोबतचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींची ऑफर नाकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये होते. त्यांनी जाहीरसभेतून तुम्हाला सोबत येण्याची ऑफर दिली आहे, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त करत ते पुन्हा महाराष्ट्रात आले? सहाव्यांदा की सातव्यांदा आले? असा आश्चर्यचकीत सवाल शरद पवार यांनी विचारला. त्यानंतर पवार यांनी मोदींची ऑफर नाकारत असल्याचं स्पष्ट केलं.

हे माझ्याचानं होणार नाही

माझी काही व्यक्तिगत मते आहेत. त्यांच्याशी संबंध हा वेगळा भाग आहे. धोरणातील संबंधातील मतं वेगळं आहे. या देशात संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आलीय. हे माझं मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करून तुरुंगात टाकलं. यामागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. मग ते सत्ताधारी असतील किंवा इतर… अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही… व्यक्तीगत संबंधाचं सोडा… पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

तर गैर विश्वास निर्माण होईल

गांधी, नेहरूंची विचारधारा काँग्रेसची आहे. गांधी, नेहरुंची विचारधारा एखाद्या समाजाच्या विरोधात नाही. मोदींचं एक स्टेटमेंट मी वाचलं. त्यांनी त्यात मुस्लिम समाजाचा वेगळा उल्लेख केला. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर हिंदू, मुस्लिम आणि ईसाई या सर्व घटकांना एकत्र घेऊन देश पुढे न्यावा लागेल. एखाद्या समाजाबाबत वेगळी भूमिका मांडली तर समाजात गैर विश्वास होईल. मोदींची अलिकडील सर्व भाषणं ही समाजासमाजात गैर विश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशासाठी ते घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही. त्यामुळे अशा ठिकाणी मी आणि आमचे सहकारी जाणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

मोदी अस्वस्थ

जे काही निवडणुकीतील टप्पे झाले. त्यातील एकंदरीत चित्र मला दिसतंय. नेमकी परिस्थिती दिसते. मोदींनी काही निर्णय घेतले. त्यावरून मोदींच्या भूमिके विरोधात जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून मोदी अस्वस्थ आहेत. अशा विधानातून त्यांची अवस्थता दिसते. ही कन्फ्यूज करणारी भूमिका आहे, असा टोला त्यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे...
उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप