‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहते. मालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतात. सोनी मराठी वाहिनीवर नुकताच नव्या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. मालिकेचे नाव आहे ‘तू भेटशी नव्याने’. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
अभिनेता सुबोध भावे हे यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

सुबोध भावे यांनी मालिकेमध्ये पुनरागमन केलं आहे. सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सोनार पाहायला मिळणार आहे. शिवानीने आजवर निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेबद्दलच्या उत्सुकतेमुळे प्रेक्षकांनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोनी मराठी वाहिनी आणि सुबोध, शिवानी यांच्यावर झाला आहे. या प्रोमोत आपल्याला सुबोधच्या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. AI च्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखविला जाणार आहे. अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा दूरचित्रवाणीवर पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे आणि हे पहिलं पाऊल सोनी मराठी वाहिनीने उचललं आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये 25 वर्षांपूर्वीच्या कॉलेजमधल्या आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसतो आहे. तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेतही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही. हा प्रोमो शेअर करताना सोनी मराठी वाहिनीने म्हटलं आहे.” AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेमुळे मालिका जगतात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे.‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेबद्दलच्या इतर गोष्टी अजून गुलदस्त्यात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;