लालबाग येथील चाळीत घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

लालबाग येथील चाळीत घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

लालबाग येथील दिग्विजय चाळीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे.त्यांचे कुटुंब गावी गेले असताना ही चोरी झाली आहे. ते गावावारुन आले असता त्यांना घरातले सामान विखुरलेले दिसले. तसेच कपाट फोडून आईचे, मुलीचे व पत्नीचे दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यातील रोख रक्कमही गायब होती. त्यांनी काळाचौकी पोलिसांना याबाबत माहिती दिली असून पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे.

लालबाग येथील दिग्विजय चाळीत राहणाऱ्या निलेश पवार यांच्या घरी चोरी ही चोरी झाली आहे. निलेश पवार आपल्या कुटुंबासोबत गावी गेले असताना घरफोडी करून चोरी करण्यात आली आहे. ते गावावरून आले असता त्यांना घरातील सामना विखुरलेले दिसले. तसेच कपाट तोडून त्यातील आईचे, मुलीचे व पत्नीचे दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच रोख रक्कम रुपये 1 लाख 75 हजार असा एकून 16 लाख 15 हजार रूपयांची चोरी झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कृष्णा रवी महेशकर याने चोरी केल्याचे संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर गुन्हेगार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने याआधी आग्रीपाडा, भायखळा, काळाचौकी परिसरात चोऱ्या केल्या आहेत. असे पोलिसांचे म्हणणे आहे. काळाचौकी पोलीस ठाणेत सदर गुन्ह्याचे एफआयआर दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सदर बाबतीत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;