छत्रपती संभाजीनगर, जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या आज झंझावाती सभा

छत्रपती संभाजीनगर, जालन्यात  उद्धव ठाकरे यांच्या आज  झंझावाती सभा

मतदानाच्या तिसऱया टप्प्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे 13 मे रोजी मतदान होत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. या दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीची तलवार तळपणार असून उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत जाहीर सभा होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, गद्दार गटाचे संदिपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तर जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यासमोर काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जालना येथे डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी दुपारी 2 वाजता डॉ. फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

महाविकास आघाडीच्या या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱयांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;