जालना शहरात कचराकुंडीमध्ये आढळली शेकडो मतदान कार्डं

जालना शहरात कचराकुंडीमध्ये आढळली शेकडो मतदान कार्डं

जालना लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र आज 9 मे रोजी शहरातील मुख्य वस्तीमध्ये नूतन वसाहत भागात कचराकुंडीमध्ये शेकडो मतदान कार्डं नागरिकांना आढळून आली आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना व निवडणूक अधिकार्‍यांना व जिल्हाधिकार्‍यांना दिली, यावेळी अधिकार्‍यांनी तत्काळ येऊन ही मतदान कार्डं जप्त केली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालना लोकसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना जालना शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, जालना शहरातील नूतन वसाहत येथे बोगस मतदान कार्ड हे कचराकुंडी सारख्या ठिकाणी आढळून आले आहे, ते मला तुमच्या त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळाले. असा प्रकार असेल तर ही फार गंभीर बाब आहे. लवकरच तुमच्या या क्लिपचा संदर्भ घेऊन आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना जाऊन भेटून याविषयीची तक्रार देतो. उद्या अशा पद्धतीचे बोगस कार्ड घेऊन कोणीही मतदार मतदानाला येता कामा नये. आमच्या मूळ मतदाराचे मतदान करून कोणीतरी बोगस येऊन मतदान करून जायचा असेही होता कामा नये. म्हणून त्या दृष्टीने जे मतदान केंद्राध्यक्ष किंवा अधिकारी असतात त्यांना याच्यावर लक्ष द्यावे लागेल की जे आणलेले मतदान कार्ड किंवा आलेल्या वोटर या दोन्हीच्या फोटोमध्ये आणि चेहऱ्यामध्ये साम्य आहे की नाही याची सुद्धा पडताळणी करण्याची गरज अस मला वाटतं, अशा पद्धतीची तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे करणार असल्याची माहिती डॉ. कल्याण काळे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;