नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही; विलेपार्लेत गुजराती बिल्डरने मराठी माणसाला घर नाकारले

नॉनव्हेज खात असाल  तर घर मिळणार नाही; विलेपार्लेत गुजराती  बिल्डरने मराठी  माणसाला घर नाकारले

अलीकडेच एका गुजरातच्या कंपनीने गिरगावातील कार्यालयात नोकरीसाठी मराठी उमेदवारांना डावलल्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच मराठी संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया विलेपार्लेत एका गुजराती बिल्डरने चक्क मराठी माणसाला घर नाकारल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही, असा फतवाच या बिल्डरने काढला.  याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या दणक्यानंतर बिल्डर ताळय़ावर आला असून घर देताना यापुढे आम्ही भेदभाव करणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

मिंधे सरकारच्या राज्यात मुंबईत मराठी माणसालाच डावलले जात असल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. मराठीबहुल विलेपार्ल्यात काही बिल्डर्स मराठी माणसांना घर देताना जाणीवपूर्वक किंमत वाढवून सांगतात. तसेच नॉनव्हेज खाणाऱयांना घर नाकारले जात आहे. असाच अनुभव जुईली शेंडे यांना आला. याप्रकरणी त्यांनी तत्काळ शिवसेना शाखेशी संपर्क केला.

 तर शिवसेना स्टाईल धडा शिकवू

महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना नेते-आमदार अॅड अनिल परब यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांनी ऑर्किड बिल्डरचे अमित जैन यांच्या ऑफिसमध्ये घेराव घालून त्यांना निवेदन दिले. यापुढे मराठी माणसांना घर नाकारले किंवा नॉनव्हेज खाणाऱयांना घर नाकारले तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा दिला. यावेळी विलेपार्ले विधानसभा संघटक संदीप नाईक, विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, रूपाली शिंदे, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, अनिल मालप, सिद्धेश पवार, पोपट बेदरकर, आनंद पाठक, नितेश गुरव, मुन्ना साबळे, हंसराज गुप्ता आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे...
उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप