ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि इतिहास संशोधन क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मेहेंदळे यांच्यावर गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शालेय जीवनापासूनच इतिहासाची आवड असलेल्या मेहेंदळे यांनी 1969 साली पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात केली. गेली 50 वर्षे त्यांनी इतिहासाच्या संशोधनकार्याला वाहून घेतले होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिले आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर’, ‘शिवाजी लाइफ अॅण्ड टाइम’ हा इंग्रजी ग्रंथ तसेच ‘श्री राजा शिवछत्रपती खंड 1, 2’, ‘शिवचरित्र’, ‘मराठ्यांचे आरमार’, ‘टिपू अॅज ही रिअली वॉज’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List