निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा

निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा

वातावरणात बदल झाला की, आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. खासकरून थंडीमध्ये केस खूपच कोरडे होऊ लागतात. केसांमध्ये कोंड्याची समस्या ही थंडीमध्ये वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना हानिकारक ठरतात. परंतु मेंदी मात्र केसांसाठी कायमच गुणकारी ठरलेली आहे.

Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा

मेंदीचा सर्वात लोकप्रिय वापर नैसर्गिक केसांचा रंग म्हणून आहे. तथापि पांढरे केस रंगवण्याव्यतिरिक्त मेंदीचे केसांसाठी इतर अनेक फायदे आहेत. मेहंदी आपल्याला कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. बहुतेक लोक डोक्यातील कोंडामुळे त्रस्त आहेत. डोक्यातील कोंडा ही एक जुनी समस्या आहे. डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून केवळ एकच नाव ते आहे मेहंदी. मेंदीने तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.

Hair Color Tips – केसांना कलर केल्यानंतर तेल लावायला हवे का? वाचा

नारळाचे तेल, लिंबाचा रस आणि मेंदीचे हेअर पॅक – एका वाडग्यात चार चमचे मेंदी पावडर घ्या आणि त्यात थोडे खोबरेल तेल घाला. तसेच एक चमचा ताज्या लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य एकत्र करा. हे हेअर पॅक केसांवर लावा. 30-45 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. त्यानंतर कंडिशनर देखील लावा. हे मेंदीचे हेअर पॅक आठवड्यातून एकदा वापरल्यास उत्तम.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स