IND Vs PAK Asia Cup 2025 – पाकिस्तानशी क्रिकेट आणि व्यापार करू नये, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका

IND Vs PAK Asia Cup 2025 – पाकिस्तानशी क्रिकेट आणि व्यापार करू नये, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका

Asia Cup 2025 मध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये खेळला जाणार आहे. परंतु हा सामना सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहलगाम हल्ल्यात धर्म विचारून निष्पाप नागरिकांचा खून करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणवापूर्ण स्थिती आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जात आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने या सामन्यावरून मोठं वक्तव्य करत सामन्याला विरोध दर्शवला आहे.

हरभरजन सिंग मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. तेव्हा तो म्हणाला की, “हिंदुस्थान-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेमध्ये असतो. परंतु ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वांचचं म्हणण आहे की, पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार करू नये. आम्ही World Championship of Legends मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलो नाही. प्रत्येकाचे स्वत:चे मत असते. परंतु माझ्या मते दोन्ही देशांमधील संबंध सुधारेपर्यंत क्रिकेट आणि व्यापार होऊ नये. असं माझं मत आहे. सरकार म्हणत आहे की जर सामना होऊ शकतो तर, तो झाला पाहिजे. पण दोन्ही देशांमधील संबंधही सुधारले पाहिजेत.” अशी भुमिका हरभजन सिंगने मांडली असून त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकारच दिला आहे.

पूर्वीसारखी सध्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची चर्चा होताना दिसत नाहीये. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण परिस्थीतीमुळे हिंदुस्थानच्या अनेक माजी खेळाडूंनी तसेच चाहत्यांनी सुद्धा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. याचा सामन्याच्या तिकीट विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कारण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटलं की काही तासातच तिकीटांची विक्री व्हायची आणि स्टेडियम खचाखच भरायचं. परंतु रविवारी होणाऱ्या सामन्याच्या तिकीट अजूनही म्हणाव्या तशा विकल्या गेलेल्या नाहीयेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – थकित कर्जदारांविरोधातील आमची कारवाई योग्य, राजापूर अर्बन बॅंक आपल्या भूमिकेवर ठाम Ratnagiri News – थकित कर्जदारांविरोधातील आमची कारवाई योग्य, राजापूर अर्बन बॅंक आपल्या भूमिकेवर ठाम
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील थकित कर्जदारांविरोधात कर्जवसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये रत्नागिरी...
आदित्य ठाकरे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पागडीअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चा
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! सरकारचे एक पाऊल मागे, पोलीस भरतीसाठी वाढवली वयोमर्यादा
Sindhudurg News – सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट वाहतुकीसाठी खुला होणार
आफ्रिकन देश काँगोत मोठी दुर्घटना, बोट उलटून ८६ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल
चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, फाशीची शिक्षा व्हायला हवी