Latur News – मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला, लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात पावसासोबत मांजरा नदीने हाहाकार उडवला आहे. पुन्हा एकदा मांजरा प्रकल्पातून अधिकचा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. १९२१८.५३ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. एकीकडे पाऊस जोरदार पडतोय आणि दुसरीकडे मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात सुरू करण्यात आला आहे.
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने (29 आॅगस्ट) गेट क्रमांक 1,3, 4 व 6 गेट आणखीन 1.00 मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
२८ आणि २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात सध्या १५ हजार ७२४ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरील गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आणि विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List