हार्बरचे बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण लटकले, काम पूर्ण होण्यास आणखी अडीच वर्षे लागणार

हार्बरचे बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण लटकले, काम पूर्ण होण्यास आणखी अडीच वर्षे लागणार

हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवली स्थानकापर्यंत विस्तार करण्याचा प्रकल्प भूसंपादनाच्या कचाटय़ात खोळंबला आहे. अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक कांदिवली येथील जागेच्या संपादनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळे हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यास डिसेंबर 2027 उजाडणार आहे. रेल्वेने ही डेडलाइन डोळय़ापुढे ठेवली असली तरी कामाला आणखी विलंब होऊ शकतो, असे मत रेल्वे तज्ञांनी व्यक्त केले आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंधेरीच्या पुढे गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी पुढच्या एक-दोन वर्षांत बोरिवलीपर्यंत हार्बरच्या लोकल ट्रेन धावतील अशी अपेक्षा होती, मात्र मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यान मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे विस्तारीकरणाचे काम रेंगाळून सध्या ते मालाडपर्यंत पूर्ण झाले आहे. कांदिवली पूर्वेकडील जागा संपादित करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. प्रकल्प बाधितांशी यशस्वी चर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष काम मार्गी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

सात वर्षांपासून रखडपट्टी

सध्या सीएसएमटी ते गोरेगावदरम्यान लोकल धावत आहेत. हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंतचा शेवटचा विस्तार 2018 मध्ये पूर्ण करण्यात आला, मात्र त्यापुढील काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मागील सात वर्षांपासून कामाची रखडपट्टी झाली आहे.

 गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत हार्बर रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिका आणि स्थानकांच्या कामासाठी 825 कोटींहून अधिक खर्च केला जाणार.
 गोरेगाव ते मालाडदरम्यान 2 किमीचा पहिला टप्पा आणि मालाड ते बोरिवलीपर्यंत 5 किमीचा दुसरा टप्पा अशाप्रकारे हार्बर विस्तारीकरण प्रकल्पाचे काम करण्यात येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;