गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ
सनई चौघड्याची सुरेल सुरावट, ढोलताशा तसेच बँडबाजाच्या दणदणाटात बुधवारी गणरायाचे आगमन झाले. दुपारपर्यंत घराघरात पार्थिव गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झाली, तर सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी मोरया रे… बाप्पा मोरया रे…अशा गगनभेदी गजरात मंगलमूर्तींची स्थापना केली.
अठरा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणाधिपतीचे आगमनही भव्यदिव्यच! कुठे आभाळाला भेदून जाणारा जयजयकार, कुठे बालगोपाळांनी बेधुंद होत वाजवलेला ढोलताशा, कुठे बँडबाजाच्या अप्रतिम वादनात शाही मिरवणुकांनी गणराजाचे आगमन झाले. मोदक, लाडूचा नैवेद्य! वरुणराजानेही गजवदनाच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्या. दहा दिवसांचा शाही पाहुणा, त्याची सरबराईही शाहीच…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List