घरं वाहून गेली, गाड्या चिखल्यात रुतल्या; 4 जणांचा मृत्यू, जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये ढगफुटीनंतर हाहाकार
जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. थाथरी उपमंडळामध्ये अति मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला असून यात 10 घरं वाहून गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘आज तक‘ने दिले आहे.
डोंगरावरून अचानक वाहून आलेल्या दगड, धोंडे, चिखलामुळे मोठी वित्तहानी झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिनाब नदीनेही धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागामध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
ढगफुटीनंतर जम्मू-काश्मीरमधील नद्यांना महापूर; डोडामध्ये 10 घरं वाहून गेली, 4 जणांचा मृत्यू#JammuKashmir #cloudburst pic.twitter.com/9ewGzbc7ZV
— Saamana Online (@SaamanaOnline) August 26, 2025
डोडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागामध्ये ढगफुटी झाल्याने चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी वाढली असून काही घरं वाहून गेली आहेत. याबाबत जम्मू-कश्मीरचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
#WATCH | Doda, J&K | The water level of the Chenab River increases due to heavy rainfall pic.twitter.com/iV3u7KqWqP
— ANI (@ANI) August 26, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List