गणेशोत्सवामुळे मुंबईत आंदोलनास परवानगी नाही; हायकोर्टाने मनोज जरांगे यांना बजावली नोटीस
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एमी फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती आलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली आहे.
मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईबाहेर नवी मुंबई किंवा खारघर येथे आंदोलनास परवानगी देण्याची मुभा आहे, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच न्यायालयाने मनोज जरांगे यांनाही नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. याबाबत आता पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.
काय म्हणाले न्यायालय?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी तैनात पोलिसांवर अतिरिक्त ताण येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी नवी मुंबई किंवा खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List