Ratnagiri News – माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून करणाऱ्या जन्मदात्रीला जन्मठेप

Ratnagiri News – माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून करणाऱ्या जन्मदात्रीला जन्मठेप

मुलगा हवा होता पण मुलगी झाल्याने नाराज मातेने स्वतःच्याच एक महिन्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या मातेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी महिलेला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शिल्पा प्रविण खापले असे आरोपी मातेचे नाव आहे.

शिल्पा खापले ही पती, दोन मुली आणि सासू-सासऱ्यांसोबत चिपळूण तालुक्यातील वहाळ, घडशीवाडी येथे राहत होती. शिल्पाला पहिली मुलगी होती आणि दुसऱ्यांदा मुलगा व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र तिला दुसऱ्या वेळीही मुलगीच झाल्याने ती नाराज होती. यातूनच 5 मार्च 2021 रोजी घरी कुणीही नसल्याची संधी साधून शिल्पाने आपल्या एक महिन्याच्या लहान मुलीला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवले.

शेजारी आल्यानंतर तिने मुलगी बेशुद्ध पडल्याचा बनाव केला. सुरुवातीला सावर्डे पोलिसांनी आस्कमिक मृत्यू नोंद करुन चौकशी केली. परंतु, गुन्ह्याची सर्व परिस्थिती व एकूण पार्श्वभूमी विचारात घेवून मुलीची हत्याच झाली आहे, असे निष्पन्न झाले. यानंतर भा.द. वि. कलम 302 अन्वये सुरुवातीस अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलीस उपअधिक्षक सचिन बारी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपी माता शिल्पा प्रविण खापले हिनेच हत्या केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने तिच्या विरुध्द आरोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अनुपमा ठाकूर यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्याकरीता एकूण 15 साक्षीदार तपासले. अभिलेखावरील सरकार पक्षाचा एकंदरीत साक्षीपुरावा, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शेजारी राहणाऱ्या साक्षीदारांनी दिलेली महत्वपूर्ण साक्ष व सखोल युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आरोपीस दोषी ठरवले. आरोपीविरोधात भा.द.वि कलम 302 अन्वये आजन्म कारावास आणि 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्हालाही वारंवार छातीत जळजळते किंवा अ‍ॅसिडिटी होते? मग काळजी घ्या, कारण असू शकतात या आजारांची लक्षणे तुम्हालाही वारंवार छातीत जळजळते किंवा अ‍ॅसिडिटी होते? मग काळजी घ्या, कारण असू शकतात या आजारांची लक्षणे
अवेळी झोप, जेवण किंवा धावपळीच्या दिनक्रमात जेवणाच्या चुकलेल्या वेळा आणि अनहेल्थी खाणं यामुळे अॅसिडिटी होणं सामान्य आहे. तर कधी कधी...
Maratha Reservation – मनोज जरांगे यांच्या काय होत्या मागण्या? सरकारने काय दिलं उत्तर? वाचा…
पाळीव कुत्र्यामुळे वाचले कुटुंबाचे प्राण, भूस्खलनात घर गेले पण जीव वाचले
PHOTO – ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
Rahul Deshpande Divorce – गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, 17 वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय
निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते पवन खेरा यांना बजावली नोटीस, काय आहे कारण?
दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुके नारळ खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात; सुपरफूडचे अनेक फायदे