झोपताना उशाजवळ लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ लावा अन् ठेवा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे नक्कीच मिळतील
सर्वांच्या स्वयंपाक घरात असणारं लिंबू हे जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही अनेक पद्धतीने गुणकारी असतं. शरीराला डिटॉक्सिफाय करण्यापासून ते पचनक्रिया वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे आणि बरेच काही. तसेच, त्याचा सुगंध असा आहे की तो त्वरित मूड ताजेतवाने करतो. पोटाचे काही समस्या असेल तर लिंबूपाणी हे नक्कीच त्यावर फायदेशीर ठरतं.
लिंबाचे असे फायदे जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पण तुम्हाला अजूनही असेही काही लिंबाचे फायदे आहेत जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यातील एक म्हणजे लिंबाच्या तुकड्यावर थोडेसे मीठ शिंपडून तुमच्या उशाजवळ ठेवा. हा एक अतिशय गुणकारी उपाय आहे. ज्याचे फायदे कदाचितच तुम्हाला माहित असतील. काय आहेत याचे फायदे जाणून घेऊयात.
बंद नाकापासून आराम मिळतो
झोपताना बेडजवळ लिंबाचा तुकडा ठेवल्याने तुम्हाला श्वास घेण्यास मदत होते. लिंबूमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे बंद नाक खुले करण्यास आणि श्वास घेण्यास मदत करतात. ज्यांना दमा किंवा सायनससारखे आजार आहेत त्यांनी विशेषतः लिंबाचा हा उपाय वापरून पहावा कारण ते त्यांच्या फुफ्फुसांचे मार्ग उघडण्यास मदत करते. छातीत जडपणा कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. हळू हळू त्यांना याचा प्रभाव दिसू लागेल.पण यासोबतच डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार सुरु ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे
रक्तदाब कमी करण्यास मदत करते
अनेक अभ्यासांनी हे देखील सिद्ध केले आहे की लिंबू रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. झोपताना उशाजवळ लिंबाचा तुकडा ठेवल्याने तुम्हाला रात्रभर लिंबाचा ताजा सुगंध येतो, ज्यामुळे रक्ताभिसरण नियमित होण्यास मदत होते. जर तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही ही युक्ती नक्की वापरून पहा. पण यासोबतच डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार सुरु ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे
ताण कमी करण्यासाठी प्रभावी
लिंबाचा ताजेतवाने आणि ओलसर असलेला सुगंध ताण कमी करण्यास खूप मदत करतो. अरोमाथेरपीमध्ये लिंबाला ‘स्ट्रेस बस्टर’ म्हटले जाते. ते आपल्या मेंदूत आनंदी रसायन ‘सेरोटोनिन’ चे उत्पादन वाढवते, जे मूड स्विंग आणि चिंता कमी करण्यास मदत करते. जर तुम्हालाही तणावाशिवाय शांत झोपायचे असेल तर हा उपाय नक्कीच करू शकता.
डासांपासून मुक्तता मिळवा
जर तुम्हाला रात्री झोपताना डासांचा त्रास होत असले तर तुम्ही तुमच्या पलंगावर लिंबाचा तुकडा ठेवावा. खरं तर, डासांना लिंबाचा वास अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्यासोबत लिंबू ठेवला तर ते तुमच्या जवळही येणार नाहीत.
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. बाहेरची धूळ सहज आपल्या घरातील वातावरावर देखील परिणाम करू शकते. लिंबाचा हा सोपा उपाय यामध्ये मदत करू शकतो. खरं तर, लिंबाच्या विषारी पदार्थांपासून मुक्तता मिळवण्याच्या गुणधर्मांमुळे हवेची गुणवत्ता सुधारते. लिंबाचा तीव्र आणि ताजा वास तुमच्या सभोवतालची हवा नैसर्गिकरित्या शुद्ध आणि ताजी करण्यास मदत करतो. यामुळे चांगली झोप येण्यास देखील मदत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List