जालन्यातील राजूर -टेंभुर्णी रोडवर चारचाकी वाहन विहिरीत कोसळले; पाच जणांचा मृत्यू

जालन्यातील राजूर -टेंभुर्णी रोडवर चारचाकी वाहन विहिरीत कोसळले; पाच जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी – राजूर रोडवरील गाडेगव्हान फाट्याजवळ घडलेल्या अपघातात चारचाकी गाडी रोडच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई येथून ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले, निर्मला सोपान डकले (रा.गुंगी गेवराई), पद्माबाई लक्ष्मण भामीरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भामीरे (रा.कोपर्डा ता.भोकरदन) आणि वाहनचालक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ते पाच जण मेहकर तालुक्यातील सुलतानपूरकडे जात होते. यावेळी सकाळी गाडेगव्हाण येथील माजी सरपंच भगवान बनकर व त्यांचे सहकारी रोडवर फिरत असताना गाडीने त्यांनी धडक दिली आणि चारचाकी जवळच्या विहिरीत कोसळली. कारच्या धडकेत बनकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजेदरम्यान घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीची खोली जवळपास ७० फूट असून पाणीपातळी ६० फुटापर्यंत असल्याने अग्निशमन दल व एन. डी.आर.एफ.टीम बोलावण्यात आली असून गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत एक मृतदेह विहीरीतून वर काढण्यात आला
असून बाकी मृतदेह व गाडी वर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर...
झोपताना उशाजवळ लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ लावा अन् ठेवा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे नक्कीच मिळतील
Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका
Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले
अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, दोघे पोलिसांच्या ताब्यात
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली