हे करून पहा…उकडीचे मोदक बनवायचे असतील तर…
उकडीचे मोदक बनवायचे असतील तर सोप्या टिप्स आहेत. सर्वात आधी तांदळाचे पीठ, किसलेले खोबरे, किसलेला गूळ, साजूक तूप, बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स, वेलची पूड घ्या. मोदक बनवण्यासाठी आधी सारण तयार करा. एका पातेल्यात एक चमचा तूप घालून किसलेले खोबरे हलके भाजून घ्या. त्यात गूळ घालून मिक्स करा.
थोडी वेलची घाला. गूळ आणि खोबरे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर गॅस बंद करा. सारण तयार झाले. एका कढईत थोडेसे पाणी घालून चमचाभर तूप घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचे पीठ घाला. पीठ अर्धे शिजल्यावर काढून घ्या. पिठाचा एक छोटा गोळा दाबून त्यात खोबऱ्याचे सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या. मोदकाला 15 ते 20 मिनिटे वाफ द्या. मोदक तयार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List