आयफोन 17 9 सप्टेंबरला येतोय!

आयफोन 17 9 सप्टेंबरला येतोय!

आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगची आयफोन चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली असताना अ‍ॅपल कंपनीने अखेर या सीरिजच्या लाँचिंगचे निमंत्रण पाठवणे सुरू केले आहे. कॅलिफोर्नियाच्या क्युपर्टिनो येथील अ‍ॅपल पार्कमध्ये 9 सप्टेंबरला आयोजित केल्या जाणाऱ्या ऑ-ड्रॉपिंग इव्हेंटची कंपनीने घोषणा केली आहे. आयफोन 17 सीरिज हिंदुस्थानी वेळेनुसार, रात्री साडे दहाच्या सुमारास सुरू होईल. अ‍ॅपल कंपनी या सीरिज अंतर्गत एकूण चार आयफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 एअर या चार फोनचा समावेश आहे.

आयफोन 17 प्रो मॅक्सची फिचर्स

आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 6.8 इंचाचा एक्सडीआर ओलेड स्क्रीन दिली जाऊ शकते. याचा रिफ्रेश रेट 120 हर्टझ् असेल. फोनमध्ये अ‍ॅपल ए 19 प्रो चिपसेट दिली जाणार आहे. फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. या फोनमध्ये एक नवीन कॅमेरा फिचर्स मिळू शकते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 48 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स मिळतील. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी 5500 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच 25 वॅट मेगासेफ वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;