सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य कसे बिघडत आहे? जाणून घ्या

सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य कसे बिघडत आहे? जाणून घ्या

आजच्या या युगात अनेक लोक सोशल मीडियाचा वापर करत आहेत. लोक या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहतात, परंतु सोशल मीडियाचे व्यसन आता लोकांना मानसिकदृष्ट्याही आजारी बनवत आहे. हे का घडत आहे?

लोक सकाळी उठताच, प्रथम त्यांचा मोबाईल उचलतात आणि सोशल मीडिया स्क्रोल करायला लागतात. इंस्टाग्रामवरील फोटो, फेसबुकवरील स्टेटस आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेज तसेच दिवसाची सुरुवात स्क्रीनवरूनच करतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत, सोशल मीडिया लोकांना जोडण्याचे एक साधन होते. मित्र, नातेवाईक, जगभरातील अनोळखी लोक देखील एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत होते. मात्र आत्ताच्या काळात फोटो शेअर करणे, नवीन ट्रेंड जाणून घेणे आयुष्याचा एक भाग बनले आहे. पण ही सवय जसजशी वाढत गेली तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील दिसू लागले.

आता सोशल मीडियाच्या या सवयी हळूहळू आपल्या मनावर आणि मनःस्थितीवर परिणाम करू लागल्या आहेत . यामुळे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा एक चांगला भाग सोशल मीडियावर दाखवतो, सुंदर फोटो, प्रवास, उत्तम जीवनशैली. हे पाहून बरेच लोक आपल्या आयुष्याला कमी लेखू लागतात. या गोष्टीमुळे ताण, चिंता आणि कधीकधी नैराश्य देखील येते.

लाईक्समुळे मिळणाऱ्या डोपामाइनच्या प्रभावाचे व्यसन लागणे

आणखी एक मोठी समस्या म्हणजे डोपामाइनचा परिणाम. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक लाईक आणि कमेंटने मेंदूला थोडासा आनंद मिळतो आणि हळूहळू तो व्यसनाचा विषय बनतो. पोस्टला कमी लाईक्स मिळाल्यास मूड खराब होणे. ही पद्धत त्याच प्रकारे कार्य करते जसे एखाद्याला साखर किंवा गेमिंगचे व्यसन लागते.

सोशल मीडियाचा झोपेवर नकारात्मक परिणाम

सोशल मीडियाचा झोपेवरही थेट परिणाम होतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रोल केल्याने योग्य झोप येत नाही आणि मेंदू थकलेला राहतो. या थकव्यामुळे दुसऱ्या दिवशी एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि मानसिक थकवा येतो. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे लोक एकाकीपणाचे बळी होत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते असा विचार करतात की त्यांना फॉलो करणारे लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत, त्यांची काळजी घेतात, परंतु वास्तविक जीवनात ती फक्त एक संख्या आहे. सोशल मीडियामुळे खरे नातेसंबंध आणि संभाषणे मागे राहतात.

वास्तविक जगात लोकांना भेटा

जे लोक सोशल मीडियाचा वापर कमी करतात त्यांच्यामध्ये फक्त सोशल मीडियाद्वारे आयुष्य जगणाऱ्या लोकांपेक्षा तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी असतात. यावरून स्पष्ट होते की जे लोक त्यांचे चांगले आणि वाईट दोन्ही गुण जगासमोर उघड करून आपले जीवन जगतात ते दर आठवड्याला नवीन फिल्टर लावण्यास उत्सुक असलेल्या लोकांपेक्षा अधिक आनंदी असतात.

यावर उपाय काय?

सोशल मीडिया पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही, परंतु त्याचा वापर संतुलित पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. दिवसभरात सोशल मीडियासाठी एक निश्चित वेळ ठेवा, अनावश्यक स्क्रोलिंग टाळा आणि झोपण्यापूर्वी फोन वापरण्याची सवय सोडून द्या. तसेच, तुमच्या वास्तविक जीवनात नातेसंबंधांना वेळ देणे सर्वात महत्वाचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर...
झोपताना उशाजवळ लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ लावा अन् ठेवा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे नक्कीच मिळतील
Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका
Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले
अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, दोघे पोलिसांच्या ताब्यात
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली