महिलांसाठी मुंबई सर्वात सुरक्षित तर दिल्ली असुरक्षित, ’नारी’च्या अहवालातून माहिती समोर
मुंबई, कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर ही शहरे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे आहेत. तर पाटना, जयपूर, फरीदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही महिलांसाठी सर्वात कमी सुरक्षित शहरे आहेत, अशी माहिती राष्ट्रीय वार्षिक अहवाल इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी (नारी) 2025 च्या अहवालातून समोर आली आहे.
या अहवालात म्हटले की, मुंबई, विशाखापट्टणमसारख्या शहरात महिलांना अधिक समानता, नागरी सहभाग, चांगले पोलिसिंग आणि महिला-अनुकूल पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत. तर दिल्ली, पाटणा, जयपूर यासारख्या शहरात पुरुषप्रधान विचारसरणी आणि शहरी रचनेचा अभाव यामुळे महिलांच्या सुरक्षिततेची परिस्थिती वाईट आहे. हे सर्वेक्षण 31 शहरांमधील 12 हजार 770 महिलांवर करण्यात आले.
हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असून सर्वेक्षण केलेल्या 10 पैकी 6 महिलांनी त्यांचे शहर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे, परंतु 40 टक्के महिला अजूनही स्वतःला सुरक्षित नाही’ किंवा ’असुरक्षित’ मानतात. केवळ 25 टक्के महिलांना सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींवर ठोस कारवाई केली जाईल असा विश्वास वाटतो. तर 69 टक्के महिलांच्या म्हणण्यानुसार, सध्याची सुरक्षा व्यवस्था पुरेसी आहे. तर 30 टक्के महिलांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List