लातूर जिल्ह्यावर आभाळ फाटलं; 36 महसूल मंडळात अतिवृष्टी,10 पैकी 8 तालुक्यात पावसाचे धुमशान, शाळांना सुट्टी जाहीर
मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जणू आभाळ फाटले अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील तब्बल 36 महसूल मंडळामध्ये, तर दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 91.8 मिलीमीटर पाऊस कोसळला असून नदी, नाले तुंडुंब झाले आहेत. पुराचे पाणी शेतात घुसून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने ठाण मांडले आहे. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पामधून नदी पात्रात सोडले जाणारे पाणी अशा दुहेरी संकटात लातूरकर सापडले आहेत. गेल्या 24 तासात लातूर जिल्ह्यात सरासरी 91.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. लातूर तालुका 81.2 मिलीमीटर, अहमदपूर तालुका 145.2 मिलीमीटर, उदगीर तालुका 123.6 मिलीमीटर, चाकूर तालुका 152.4 मिलीमीटर, रेनापूर तालुका 106.4 मिलीमीटर, देवणी तालुका 75.8 मिलीमीटर, शिरोळ अनंतपाळ तालुका 102.5 मिलीमीटर, जळकोट तालुका 112.6 मिलीमीटर, औसा तालुका 32 मिलीमीटर आणि निलंगा तालुका 45.2 मिलीमीटर अशा पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील 36 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर महसूल मंडळ 111.. मिलीमीटर, बाभळगाव महसूल मंडळ 100.3 मिलीमीटर, हरंगुळ महसूल मंडळात 119.3 मिलीमीटर, कासारखेडा महसूल मंडळात 114 मिलीमीटर, कण्हेरी महसूल मंडळात 119.3 मिलीमीटर, अहमदपूर, खंडाळी, अंधोरी, शिरूर ताजबंद आणि हाडोळती या महसूल मंडळात प्रत्येकी 152.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे तर किनगाव महसूल मंडळात 109.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
उदगीर महसूल मंडळात 109.8 मिलीमीटर, नागलगाव महसूल मंडळात 87.8 मिलीमीटर, वाढवणा महसूल मंडळात 125.8 मिलीमीटर, नळगीर महसूल मंडळात 101.8 मिलीमीटर, मोघा महसूल मंडळात 100.8 मिलीमीटर, हेर महसूल मंडळात 176.5 मिलीमीटर, देवर्जन महसूल मंडळात 176.5 मिलीमीटर, तोंडार महसूल मंडळात 10.8 मिलीमीटर, चाकूर महसूल मंडळात 178 मिलीमीटर, नळेगाव महसूल मंडळात 138.3 मिलीमीटर, वडवळ नागनाथ महसूल मंडळात 178 मिलीमीटर, शेळगाव महसूल मंडळात 178 मिलीमीटर, झरी महसूल मंडळात 103.5 मिलीमीटर, आष्टा महसूल मंडळात 138.3 मिलीमीटर, रेणापुर महसूल मंडळात 149 मिलीमीटर, पोहरेगाव महसूल मंडळात 96.5 मिलीमीटर, पानगाव महसूल मंडळात 88.3 मिलीमीटर, कारेपूर महसूल मंडळात 103.5 मिलीमीटर, पळशी महसूल मंडळात 94.8 मिलीमीटर, वलांडी महसूल मंडळात 113.3 मिलीमीटर, शिरूर अनंतपाळ महसूल मंडळात 115.3 मिलीमीटर, साकोळ महसूल मंडळात 113.3 मिलीमीटर, हिसामबाद महसूल मंडळात 79 मिलीमीटर, जळकोट महसूल मंडळात 123.8 मिलीमीटर, घोणसी महसूल मंडळात 101.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
शाळांना सुट्टी जाहीर
लातूर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.
औराद शहाजनी ते तगरखेडा हा नवीन पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List