ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवारी सकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. कर्वे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. बाळ कर्वे यांची कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.
बाळ कर्वे यांनी नुकताच त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तीन दिवसांनी गुरुवारी सकाळी 10.15 वाजता त्यांनी राहत्या अखेरचा श्वास घेतला. बाळ कर्वे यांचा जन्म 25 ऑगस्ट 1930 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून 32 वर्षे नोकरी केली. नोकरीसोबत त्यांनी अभिनय क्षेत्रातही सातत्याने काम केले. कर्वे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि मालिका विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List