खड्डे बुजवा, शहर स्वच्छ ठेवा; अन्यथा गोमूत्राने अंघोळ घालू, सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन
शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. शहरातील मिरवणूक मार्गावर खड्डे आहेत. येत्या दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास पालिका आयुक्त व अधिकाऱयांना शेण व गोमूत्राने अंघोळ घालू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 24) महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील खड्डे, अस्वच्छता व अन्य सुविधेच्या मुद्दय़ावर अधिकाऱयांना शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी धारेवर धरत प्रचंड घोषणाबाजी केली.
गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील विविध प्रभागांमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तीन महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले तरी अद्यापही खड्डे तसेच आहेत. अनेक प्रभागांत स्वच्छता न झाल्याने आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप कडेलोट होत आहे. याला जबाबदार पालिका आयुक्त ओम्बासे व वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. येत्या दोन दिवसांत आरोग्याच्या सुविधेबरोबरच खड्डे न बुजविल्यास आयुक्तांसह अधिकाऱयांना शेण व गोमूत्राने आंघोळ घालू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, गायकवाड यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List