वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन; 9 भाविकांचा मृत्यू, ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरे, दुकाने वाहून गेली
जम्मू-कश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात घडला. अर्धपुंवारीजवळ घडलेल्या घटनेत 5 भाविकांचा तर दोडा जिह्यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 14 भाविक जखमी आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे दोडा जिह्यात अक्षरशः हाहाकार उडाला असून अनेक घरे तसेच दुकाने वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत अचानक प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी दिली. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या अपघातातील जखमींना कटरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले. मार्गातील इतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. भूस्खलनाचे अनेक पह्टो तसेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रेल्वे ट्रकही उखडला असून मोठया प्रमाणावर मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्याचे दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List