झोमॅटोच्या इटरनलला जीएसटीची 40 कोटींची नोटीस
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोची इटरनल लिमिटेड कंपनीला जीएसटी विभागाने 40 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. कंपनीला बंगळुरू येथील जॉइंट कमिश्नर (अपील)-4 कडून तीन आदेश पाठवण्यात आले आहेत. यामध्ये जुलै 2017 ते मार्च 2020 यादरम्यानचा समावेश आहे. टॅक्सच्या नोटिसीत 17.19 कोटी जीएसटी, 21.42 कोटी व्याज आणि 1.71 कोटींच्या दंडाचा समावेश आहे. जीएसटीच्या या नोटिसीला आव्हान देऊ, आमच्याकडे कायदेशीर मार्ग खुला आहे, वकिलांच्या सल्ल्यानंतर अपील दाखल करू, असे इटरनल कंपनीने म्हटले आहे. जीएसटीच्या नोटिसीनंतर इटरनलच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List