मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर

मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर

इलेक्ट्रोल बाँडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मदत करणाऱ्या मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा ९० कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर केले आहेत. रोहित पवार यांनी या संदर्भात मंगळवारी एक ट्विटही केले आहे.

विधानसभेत आपण दिलेल्या उत्तरानुसार महसूल मंत्र्यांनी मेधा इंजिनिअरिंग कंपनीला केवळ दंडात बंपर डिस्काउंटच दिलेला नाही तर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या कंपनीची जप्त केलेली वाहने, यंत्रसामुग्री तसंच डंपर सुद्धा या कंपनीला परत करण्याचे आदेश दिलेत, हे खरं आहे काय? एकीकडे गावगाड्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्यांसाठी किंवा गावकऱ्यांनी गावच्या सार्वजनिक कामांसाठी थोडाफार मुरूम काढला तर कडक कारवाई करणाऱ्या महसूल विभागाकडून मेघा इंजिनिअरिंगसाठी “बंपर डिस्काउंट सोबत डंपर रिटर्न” एवढी आकर्षक ऑफर आणि एवढी मेहरबानी का? असा सवाल रोहित पवार यांनी बावनकुळे यांना केला.

एका दुसऱ्या प्रकरणात मेधा इंजिनिअरिंगने साताऱ्या जिल्ह्यातल्या सातारा ते म्हसवड रस्त्यातलं काम करत असताना देखील अवैध उत्खनन केलं असता स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी या कंपनीला १०५ कोटींचा दंड ठोकावत या कंपनीची यंत्रसामुग्री जप्त करत बँक खाते देखील सील केलं होतं, परंतु दुर्दैवाने जून २०२२ मध्ये सरकार बदलताच डिसेंबर २०२२ मध्ये या कंपनीचा दंड माफ करत या कंपनीची यंत्रसामुग्री परत करण्याचा आदेश झाला. हे ही खरं आहे काय? महसूल विभाग आणि मेघा इंजिनिअरिंगमध्ये असा कुठला बॉण्ड झाला ज्यामुळे एवढी मेहरबानी? बावनकुळे साहेब आपल्या उत्तराची वाट पाहतोय, असेही म्हणत मी पुराव्याशिवाय बोलत नाही असा टोलाही रोहित पवार यांनी बावनकुळे यांना लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;