मुरबाडच्या बेरोजगारांना ऑन द स्पॉट नोकरी, शिवसेनेचा उपक्रम; उच्च शिक्षितांच्या हातात थेट ऑफर लेटर
पदवी मिळूनही पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुरबाडच्या बेरोजगार तरुणांना ऑन द स्पॉट नोकरी मिळाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुरबाड औद्योगिक पट्ट्यात रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला १८-३५ या वयोगटातील उच्चशिक्षीत तरुणाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या मेळाव्यात उच्च शिक्षितांच्या हातात थेट ऑफर लेटर मिळाल्याने तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
पदवी मिळवूनही रोजगाराच्या संधी अपुऱ्या पडत असल्याचे राज्यात भयान वास्तव आहे. त्यातच मुरबाड तालुक्यातील औद्योगिक पट्टयात ठेकेदारी पद्धतीची कामे आणि परप्रांतीयांचा भरणा वाढला असल्याने भूमिपुत्र नोकरीच्या शोधात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि फिव्वर स्टॉपिंग या खासगी कंपनीच्या माध्यमातून धसई येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो तरुणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे ज्यांची निवड झाली आहे अशा तरुणांना पगारासोबत पीएफ सुविधा मिळाली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, महिला संघटक रेखा कंटे, रवींद्र डोहळे, तालुकाप्रमुख संतोष विशे आदी उपस्थित होते.
जागोजागी असे मेळावे भरवणार
मुरबाडच्या तालुक्यात जागोजागी असे मेळावे भरवून तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिक सामाजिक कार्य घेऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल, असे आश्वासन साईनाथ तारे यांनी तरुणांना दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List