गणेशोत्सवात थंडावलेली कारवाई पुन्हा जोरात; दिव्यातील 5 बेकायदा इमारतींवर बुलडोझर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासन इन अ‍ॅक्शन

गणेशोत्सवात थंडावलेली कारवाई पुन्हा जोरात; दिव्यातील 5 बेकायदा इमारतींवर बुलडोझर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासन इन अ‍ॅक्शन

गणेशोत्सवात बेकायदा बांधकामांविरुद्ध थंडावलेली ठाणे महापालिकेची कारवाई आता पुन्हा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून आज दिव्यातील पाच बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरवला. अतिक्रमणविरोधी विभागाने या इमारती तोडण्यास सुरुवात केल्याने भूमाफिया आणि बिल्डरलॉबीचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे दहा कुटुंबे बेघर झाली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये दिवा शहरात बेकायदा इमारतींचे पेव फुटले. बिल्डरांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मोठमोठ्या इमारती उभारल्या. अनेक गरजूंनी कर्ज काढून तसेच दागिने विकून ही घरे विकत घेतली. मात्र सर्व बेकायदा इमारतींवर हातोडा चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दिव्यात आज तोडलेल्या पाचपैकी दोन इमारतींमध्ये १० कुटुंबे राहत होती, तर अन्य तीन इमारती रिकाम्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिव्याच्या बी.आर. नगरमधील दोन, सद्‌गुरूनगरमधील दोन तसेच दिवा-शिळरोड येथील एका बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे व मनीष जोशी यांनी दिली.

  • बेकायदा बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला होता. गणेशोत्सव संपताच पालिकेने आजपासून विशेष मोहीम हाती घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.
  • आतापर्यंत जवळपास २२७ बांधकामांवर कारवाई झाली असून २४ गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाईदरम्यान अडथळा आणल्यास त्वरित गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चाप लावण्यासाठी विशेष पथके

बेकायदा बांधकामांचे माहेरघर असलेल्या ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा येथील बांधकामांवर करडी नजर ठेवण्यात आली. गणेशोत्सव काळात या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी तसेच या भागातील बांधकामांवर देखरेख करण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष पथके तयार केली. दिवा आणि मुंब्रा भागातून बेकायदा बांधकामांच्या जास्त तक्रारी येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची शहानिशा केली आहे.

अधिकृत घरांमध्येच संसार थाटा

स्वप्नातील घरे घेताना फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी घरे खरेदी करण्यापूर्वी ती इमारत अधिकृत आहे की अनधिकृत आहे याची खातरजमा शहर विकास विभागाशी संपर्क साधून करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांनो अधिकृत घरांमध्ये संसार थाटा असे आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;