मुल होत नाही, मग वंध्यत्व आलं हे कधी समजावं? डॉक्टर नेमकं काय सांगतात?
आजकाल वंध्यत्त्वाचे प्रमाण फारच वाढले आहे. बदलती जीवनशैली, धापवळीचे जीवन, अपुरी झोप आणि व्यायामचा अभाव या साऱ्या गोष्टींमुळे लग्नानंतर आपत्य होत नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
दरम्यान, मुल होत नसल्याने अनेक पती-पत्नी डॉक्टरांकडे सल्ले घ्यायला जातात. तर अनेकांना आपण नेमकं काय करायला हवं, हेच समजत नाही. काही दाम्पत्यांना तर आपण वंध्यत्त्वाच्या अडचणीतून जात असून डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा, हेदेखील समजत नाही.
त्यामुळे मला वंध्यत्त्वाच्या समस्येनी ग्रासले असून आता डॉक्टरांकडे उपचारासाठी जायला हवे? हे कधी समजावे, याबाबत डॉ. हिमांशू रॉय यांनी सविस्तर सांगितले आहे. एबीपी हिंदीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
डॉ. रॉय यांच्या म्हणण्यांनुसार एखादे दाम्पत्य कोणतेही गर्भनिरोधक न वापरता शरीरसंबंध ठेवत असेल आणि तरीदेखील सलग 12 महिने उलटूनही गर्भधारणा होत नसेल तर आपल्याला वंध्यत्त्वाची अडचण असू शकते असे गृहित धरले पाहिजे. या स्थितीला इनफर्टीलीटी असेही म्हणतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List