हिंदुजा-टाटाच्या क्रिकेट स्पर्धेच्या नोंदणीला प्रारंभ

हिंदुजा-टाटाच्या क्रिकेट स्पर्धेच्या नोंदणीला प्रारंभ

मुंबईच्या रुग्णालयातील क्रिकेटपटूंसाठी वर्ल्ड कप असलेली गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या जानेवारी महिन्यात खेळविली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या संघनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 30 ऑगस्टपर्यंत ती सुरू राहणार असली तरी प्रथम येणाऱया 16 संघांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजक मिलिंद सावंत यांनी दिली.

गेली 31 वर्षे अविरतपणे या स्पर्धेचे जोरदार आयोजन हिंदुजा रुग्णालय आणि टाटा रुग्णालय संयुक्तपणे करत आहे. या दोन्ही रुग्णालयात सेवेत असलेले क्रिकेटपटू या स्पर्धेचे आत्मियतेने आयोजन करत असल्यामुळे मुंबई क्रिकेट क्षेत्रात या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायूं जाफरी यांनी पुढाकार घेत 1994 साली खासगी आणि सरकारी रुग्णालयात क्रिकेटपटूंना कायमस्वरूपी नोकरी लाभावी म्हणून या स्पर्धेचा श्रीगणेशा केला होता. जी स्पर्धा आजही जोशात सुरू आहे. ही स्पर्धा एपंदर दोन गटांत खेळविली जात असून एलिट गटात अव्वल दर्जाच्या आठ रुग्णालयांचे संघ खेळतात तर प्लेट गटातही आठ संघ आपला जोरदार खेळ दाखवतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई क्रिकेटला नंदू पाटील, अविनाश जाधव, जितेंद्र परदेशी, ओमकार जाधव, प्रदीप क्षीरसागरसारखे चमकदार क्रिकेटपटू लाभले आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता लाभलेल्या या स्पर्धेत प्रथम येणार्या 16 संघांनाच खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धा सहभागासाठी रुग्णालयातील संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अनिल बैकर (9987034381) आणि डॉ. हुमायूं जाफरी (9869441414)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य,...
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
Photo – ग्रीन साडीत अनन्याचा सोज्वळ लूक
Solapur News – सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एसटी आणि ट्रकची धडक, 16 प्रवासी जखमी
Ratnagiri News – दुर्वास पाटील प्रकरणात जयगड पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा
विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय