किश्तवाडच्या ढगफुटीतील मृतांचा आकडा 65 वर, 500 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची मुख्यमंत्र्यांची भीती

किश्तवाडच्या ढगफुटीतील मृतांचा आकडा 65 वर, 500 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची मुख्यमंत्र्यांची भीती

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमधील चासोटी गावात ढगफुटी आणि भूस्खलन होऊन अक्षरशः हाहाकार उडाला. मृत्यूने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीतील मृतांचा आकडा तब्बल 65वर गेला आहे. यातील 21 मृतांची ओळख पटली असून आतापर्यंत 167 जणांना वाचवण्यात आले आहे. तर 38 जणांची प्रपृती चिंताजनक आहे. दरम्यान, आणखी 500 जण दगड, चिखल-मातीच्या लोंढय़ाखाली अडकल्याची भीती जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.

माचौल माता यात्रेसाठी किश्तवाडमधील चासोटी गावात हजारो भाविक पोहोचले तेव्हा ही नैसर्गिक आपत्ती ओढवली. यात्रा जिथून सुरू होणार होती तिथेच ढगफुटी आणि भूस्खलन झाले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. एनडीआरएफची पथके बचावकार्य करत आहेत. 60-60 सैनिकांची पाच पथके असे एपूण 60 सैनिक, व्हाईट नाईट कॉर्प्सचे वैद्यकीय पछक, जम्मू आणि कश्मीर पोलीस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सी या ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत.

मृतदेहांची फुप्फुसे चिखलाने भरली

ढिगाऱयाखालून काढण्यात आलेल्या मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक होती. मृतांची फुप्फुसे अक्षरशः चिखलाने भरलेली होती. मृतदेहांचे अवयव विखुरलेले होते. कित्येक तास शोधमोहीम राबवल्यानंतर स्थानिक लोक, लष्करी कर्मचारी आणि पोलिसांनी चिखलातून जखमींना बाहेर काढले आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल केले.

100 ते 150 जण वाहून गेले

ढगफुटी आणि भूस्खलनाचा भयावह अनुभव लोकांनी सांगितला. मंदिराजवळ भंडारा सुरू होता. प्रचंड गर्दी होती. दुकाने लागलेली होती. हे सगळे पाणी आणि मातीच्या ढिगाऱयासोबत वाहून गेले… अनेक जण ढिगाऱयाखाली दबले गेले. एक इमारत जमीनदोस्त झाली. तिच्या ढिगाऱयाखालून लोकांनीच मृतदेह बाहेर काढले. अजूनही अनेक जण ढिगाऱयाखाली दबलेले आहेत. ओढय़ाजवळ 100 ते 150 जण होते. ते सगळे पुरात वाहून गेले. आम्ही लोकांना आवाज दिला, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, असे हसन या स्थानिक नागरिकाने सांगितले. दरम्यान, माझी बहीण, वहिनी आणि तिचे पुटुंब आम्ही सगळे वाचले. माझा छोटा  मुलगा नाल्याच्या दिशेने पळाला आणि ढिगाऱयात अडकला. त्याला बाहेर काढले, असा थरारक अनुभव एका महिलेने सांगितला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Virar building collapse – विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार Virar building collapse – विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार
विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा भाग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या इमारत दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आला...
नोकरी! एनएचपीसीमध्ये 248 पदांसाठी भरती
खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश; आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडलाय का? – रोहित पवार
जपानमध्ये फक्त दोन तास स्मार्टफोन वापरा
बीएसएनएलची भारत फायबर सर्व्हिस प्लॅनवर सूट
एआय नोकऱ्यांसाठी हुशार उमेदवार मिळेना, 10 पैकी केवळ एकच इंजिनीअर पात्र
टॅरिफमुळे हिंदुस्थानला 52 लाख कोटींचे नुकसान, छोट्या उद्योगांना मोठा झटका; लाखो नोकऱ्यांवर गंडांतर