डोक्याखालील उशीत असते अनेक जीवाणूंचे घर, टॉयलेट सीट पेक्षा जास्त खराब असते

डोक्याखालील उशीत असते अनेक जीवाणूंचे घर, टॉयलेट सीट पेक्षा जास्त खराब असते

आपण दिवसाचा बराच काळ झोपेत घालवतो.यावेळी आपला चेहरा आणि केस उशीजवळ असतात. परंतू तुम्ही कधी विचार केला आहे का ? ही उशी तुम्हाला चांगली झोप देत असली तरी ती किती स्वच्छ आहे? ज्या उशीवर रेलून तुम्ही आनंदाने आरामात निर्धास्त झोपत असता ती उशी एखाद्या टॉयलेट सीट पेक्षाही अस्वच्छ असू शकते ?

Pillow Hygiene Tips:

डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या ते उशीवर एकाच वेळी धुळ, घाम, त्वचेच्या मृत पेशी, तेल आणि आद्रता जमा होऊन बॅक्टेरिया आणि फंगस जमते.

उशीच्या नरम कापडावर अनेक बॅक्टेरिया जगतात

बॅक्टेरिया : उशीमध्ये स्टेफिलोकोकस आणि ई.कोलाई सारखे बॅक्टेरिया जगतात, जे त्वचा संक्रमण आणि एलर्जीला कारणीभूत ठरतात.

फंगस : आद्रता आणि घामामुळे उशीवर फंगस ( बुरशी ) तयार होते, त्यामुळे श्वसनाचे अनेक आजार होऊ शकतात

डस्ट : हे छोटे जीवाणू त्वचेच्या मृत पेशींवर जगत असतात आणि एलर्जी, शिंका, आणि अस्थमा वाढवू शकतात.

उशी का टॉयलेट सीटहून अधिक घाण

टॉयलेट सीटला आपण नियमित स्वच्छ करत असतो. परंतू उशीची सफाई महिनोंमहिने होत नाही. सातत्याने ती वापरल्याने त्यात घाम जमून, तेल आणि धुळ लागून ती असे पोषक वातावरण तयार करते की त्यात अत्यंत बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढते.

घाणेरड्या उशीने आरोग्यावर परिणाम

त्वचेच्या संबंधीत समस्या – चेहऱ्यावर फोड,पिपल्स येणे, रॅशेस आणि खाज सुटणे

श्वसनाचे आजार – धुळ आणि बुरशीने अस्थमा आणि एलर्जी वाढू शकते.

डोकेदुखी आणि थकवा – घाणेरड्या उशीवर झोपल्याने झोपेची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे थकवा जाणवतो

उशीला स्वच्छ कसे करावे –

उशांचा कव्हर दर आठवड्याला बदलावे

उशांचे कव्हर बॅक्टेरिया आणि धुळीच्या प्रथम संपर्कात येते असल्याने ते नियमित धुवावे

उशांना उन्हात वाळवत टाकावे

उन्हात बॅक्टेरिया आणि फंगस मरतात, महिन्यातून किमान एकदा उशांना उन्हात ठेवावे

धुता येतील अशा उशांचा वापर करावा

अशा प्रकारच्या उशांचा वापर करावा ज्या वॉशिंगमशिनमध्ये धुता येतात, स्वच्छ होतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;