बाबा रामदेव यांनी बद्धकोष्ठतेवर देशी इलाज, सकाळी होईल सगळं पोट साफ

बाबा रामदेव यांनी बद्धकोष्ठतेवर देशी इलाज, सकाळी होईल सगळं पोट साफ

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आरोग्याशी संबंधित समस्या वाढल्या आहेत. यात पोटाशी संबंधित आजार वाढले आहेत. जंक फूड, पॅकेज फूड, तेलकट आणि मसालेदार जेवण रोज घेतले तर याचा पचनावर खूपच वाईट होत आहेत. आजकाल पोटात गॅस होणे, एसिडीटी आणि बद्धकोष्ठता या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. ज्यातून सुटका होण्यासाठी अनेक लोक उपाय करत असतात आणि जण तर एलोपॅथीची औषधं देखील घेत असतात.

बद्धकोष्ठतेची समस्येला कंट्रोल करायची असेल सर्वात आधी आपल्या डाएटमध्ये काही बदल करण्याची गरज असते. याशिवाय काही भाज्या आणि फळे आहेत जी या त्रासात मदत करतात. अलिकडे पतंजलीचे फाऊंडर आणि योग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडल एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी बद्धकोष्ठता समस्या कशी कमी करतात या संदर्भात माहिती दिली आहे.

रेड ड्रँगन फ्रूट्स

पतंजली फाऊंडर आणि योग गुरु बाबा रामदेव यांनी सांगितले की रेड ड्रँगन फ्रूट्स पोटासाठी खूप चांगले होते. हे रक्तवाढीसाठी मदत करते. त्यांनी व्हिडीओत त्यांनी सांगितले की रेड ड्रँगन फूड बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी मदत करते. या फळाला खाल्ल्याने स्कीनचा ग्लो खूपच वाढतो आणि शरीरात एनर्जी राहाते.

गुलकंद आहे फायदेशीर

या आधी त्यांनी इंस्टाग्रामवर एक आणखी व्हिडीओ शेअर केला आहे.त्यात त्यांनी बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. यासाठी त्यांनी गुलाबाच्या फुलांना खूप फायदेशीर म्हटले आहे. त्यांनी सांगितले की गुलाब मेंदू, पोट आणि एसिटीडी साठी उत्तम असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओत त्यांनी गुलाबापासून बनणाऱ्या गुलकंदा संदर्भात सांगितले आहे.

गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात त्यांना स्वच्छ करावे. यासाठी एक बाऊल घ्यावे. गुलाब पाकळ्यात खडीसाखरेचे दाण टाकून त्यांना कुठावे,यात थोडा मध टाकावा, त्यात थोडी काळी मिरी टाकून चांगले वाटावे. यात थोडा वेलची दाणे टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करावे,आता हे काचेच्या भांड्यात टाकून उन्हात ठेवावे. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, एसिडीटी,गॅस पोट स्वच्छ होत नाही त्यांनी गुलकंद औषधासारखे खावे, कोलायटिसमध्येही हे गुणकारी आहे. या ताजे खावे त्यामुळे चांगला फायदा होतील.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;