सरन्यायाधीश साहेब, दैनिक ‘सामना’त आज प्रसिद्ध झालेला अग्रलेख अवलोकनार्थ पाठवत आहे; संजय राऊत यांचे भूषण गवईंना पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना विशेष अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांनी हे पत्र ट्विट करत माहिती दिली आहे.
सन्मानीय
सरन्यायाधीश साहेब
सर्वोच्च न्यायालय! pic.twitter.com/dEmi6SdCjd— Sanjay Raut (@rautsanjay61) August 2, 2025
तेलंगणातील 10 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाने परखड मत व्यक्त केले. मूळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर, लोकशाहीचे नुकसान होईल. विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती असल्याने ते बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया लांबवतात हे आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचे किरण दाखवणारे आहे त्याबद्दल आपले अभिनंदन, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
माननीय सरन्यायाधीश साहेब, आज रोजी (2 ऑगस्ट 2025) दैनिक ‘सामना’त प्रसिद्ध झालेला याच विषयावरील अग्रलेख ‘जे बोललात ते करा!’) आपल्या अवलोकनार्थ पाठवीत आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या लोकभावना आहेत, असेही संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List