सिलिंडर स्फोटात तीन मजली घर कोसळले; 15 जण जखमी, वांद्रे पूर्वच्या भारतनगर येथील दुर्दैवी घटना
सिलिंडरचा स्फोट होऊन तीन मजली घर कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे वांद्रे पूर्व भारतनगर येथील चाळीत घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडपून 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील मोहम्मद इरफान (8), रिहाना अन्सारी (65) आणि मोहम्मद अन्सारी (68) या तिघांची प्रपृती गंभीर आहे. दरम्यान, शिवसेना सचिव आणि स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेचा आढावा घेतला आणि प्रशासनाला बचावकार्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
वांद्रे पूर्व भारतनगर येथील चाळ क्रमांक 37 येथे सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सिलिंडर स्फोट झाला. त्यात तीन मजली घराचे वरचे दोन मजले कोसळले. कोसळलेल्या भिंतीखाली काहीजण अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्यात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढून जखमींना तत्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List