वडिलांचं नाव फादर, आईचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया; मतदार यादीतला अजब प्रकार पाहून मतदार गोंधळले

वडिलांचं नाव फादर, आईचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया; मतदार यादीतला अजब प्रकार पाहून मतदार गोंधळले

बिहारची विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येतेय दररोज मतदार यादीबाबत नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. बिहार मतदार यादीतून 65 लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मतदार याद्यांमधला अजून एक गोंधळ समोर आला आहे. मतदार याद्यांमध्ये काही लोकांच्या नावांमध्ये चुका असल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या नावापुढे फादर, नवऱ्याच्या नावापुढे हसबैंड तर आईच्या नावापुढे चक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लिहलेले आहे. त्यामुळे

निवडणूक आयोग मतदारांसाठी विशेष सखोल आढावा मोहीम (एसआयआर) राबवत आहे. याअंतर्गत बिहारची प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतील नोंदीतून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात चक्क पतीच्या नावासमोर ‘हसबैंड हसबैंड’, पित्याच्या नावापुढे ‘फादर फादर’ आणि आईच्या नावासमोर ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’ असे लिहिले आहे.

बिहारची प्रारुप मतदार यादी 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली असून त्यावर आता दावे आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. त्या मतदार यादीतील अजब नोंदींची छायाचित्रे सोशल मिडीयात भलतीच व्हायरल झाली असून निवडणूक आयोगाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. मतदार यादीच्या विशेष आढावा मोहिमेदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक नोंदींमध्ये मतदारांची नावे, त्यांच्या पालकांची नावे आणि धर्म यांच्या संदर्भात अनेक तथ्यात्मक चुका समोर आल्या आहेत. त्या चुका केवळ हास्यास्पद नसून त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त करुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

प्रारुप मतदार यादीमध्ये एका मतदाराचे नाव ‘मधु कुमारी कुमारी’ आणि तिच्या पतीचे नाव ‘पती पती’ असे लिहिले आहे. दुसऱ्या नोंदीमध्ये मतदाराचे नाव ‘नेहा कुमारी कुमारी’ आणि आईचे नाव ‘भारतीय निवडणूक आयोग निर्मला देवी’ असे लिहिले आहे. व्हायरल याद्या पाहून लोकांनी सोशल मिडियात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर खरमरीत कमेंट केल्या आहेत. सांप्रदायिक आणि सामाजिक रचनेशी संबंधित देखील अनेक ठिकाणी विसंगती आढळल्या आहेत. मतदार यादी तयार करताना कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी न जाताच मतदारांची माहिती नोंदवल्याचे यातून उघडकीस आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेह होईल दूर, ‘ही’ 10 योगासनं नियमित करून शरीर ठेवा निरोगी मधुमेह होईल दूर, ‘ही’ 10 योगासनं नियमित करून शरीर ठेवा निरोगी
योगाचं महत्त्व आता फक्त प्राचीन ज्ञान म्हणून मर्यादित राहिलेलं नाही, तर आधुनिक विज्ञानानेही त्याला मान्यता दिली आहे. नुकत्याच भारतात झालेल्या...
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं… संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य
IND Vs ENG 5th Test – टीम इंडियाचा दुसरा डाव संपुष्टात, इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांच आव्हान
वडिलांचं नाव फादर, आईचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया; मतदार यादीतला अजब प्रकार पाहून मतदार गोंधळले
कमी की जास्त झोप घेणारी? कोणती मुले हुशार असतात? ‘हे’ आहे तज्ज्ञांचे उत्तर
Mumbai News – बोरीवली स्थानकात प्रवासी आणि टीसीमध्ये राडा, मुजोर तरुणाकडून स्टेशन मास्तर कार्यालयात तोडफोड
सरन्यायाधीश साहेब, दैनिक ‘सामना’त आज प्रसिद्ध झालेला अग्रलेख अवलोकनार्थ पाठवत आहे; संजय राऊत यांचे भूषण गवईंना पत्र