Shah Rukh Khan injured – ‘किंग’च्या सेटवर शाहरूख खानला दुखापत, उपचारांसाठी तातडीनं अमेरिकेला रवाना

Shah Rukh Khan injured – ‘किंग’च्या सेटवर शाहरूख खानला दुखापत, उपचारांसाठी तातडीनं अमेरिकेला रवाना

बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. ‘किंग’ चित्रपटाच्या सेटवर शाहरूख खान याला दुखापत झाली झाली. अ‍ॅक्शन सीनचे चित्रिकरण सुरू असताना शाहरूखला दुखापत झाली असून यात तो जखमी झाला आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही, मात्र शाहरूख त्याच्या टीमसह उपचारांसाठी तातडीने अमेरिकेला रवाना झाल्याचे वृत्त आहे.

शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी बिग बजेट ‘किंग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र होता. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये या चित्रपटातील एका अॅक्शन सीनचे चित्रिकरण सुरू होते. याचवेळी शाहरूख खान याच्या कंबरेला दुखापत झाली. त्यामुळे तो तातडीने अमेरिकेला रवाना झाला. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या तो दुखापतीतून सावरत असून कुटुंबासोबत यूकेमध्ये असल्याची माहिती मिळतेय.

दुखापतीमुळे शाहरूख खानला आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. त्यामुळे किंग चित्रपटाचे चित्रिकरणही पुढे ढकलण्यात आले. दुखापतीतून सावरल्यानंतर सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, किंग या चित्रपटात शाहरूख खान, सुहाना खान, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अनिल कपूर, अभय वर्मा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;