एकमेकांकडे रागाने पाहिल्याने एकाचा खून, ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एकमेकांकडे रागाने पाहिल्याने एकाचा खून, ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून आणि शुक्रवारी (दि.1) सकाळी झालेल्या बाचाबाचीतून तिघांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने सराईताचा खून केल्याची घटना दुपारी ईश्वरपूर-ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजच्या समोर घडली. याप्रकरणी एकासह दोन अल्पवयीन मुलांवर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. रोहित ऊर्फ बारक्या पंडित पवार (वय 23, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) असे मृताचे नाव आहे. हौसेराव कुमार आंबी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

रोहित पवार आणि आरोपींची एकमेकांशी जुनी ओळख होती. दोन दिवसांपूर्वी रोहित याने या गुन्ह्यातील एका अल्पवयीनच्या घरी जाऊन त्याला दमदाटी केली होती. त्यानंतर आज रोहित आणि हौसेराव हे दुपारी कॉ लेजजवळ एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून झालेल्या बाचाबाचीवरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रोहित याच्याकडे आधीच धारदार शस्त्र होते. तर, त्या तिघांपैकी एकाकडे चाकू होता.

रोहित मारणार हे लक्षात येताच, त्यांनी त्यांच्याकडील शस्त्राने रोहितवर वार केले. त्यानंतर मारेकऱ्यांनी थेट ईश्वरपूर पोलीस ठाणे गाठले. तर, जखमी रोहितला लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपींनी तो आम्हाला मारणार होता म्हणून आम्हीच त्याला मारले, अशी कबुली पोलिसांना दिली. प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. अतिरिक्त पोलीस संचालक कल्पना बारवकर यांनीही सायंकाळी पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासात वैयक्तिक लक्ष घातले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च रक्तदाबासोबत लिव्हर डॅमेजची 5 लक्षणं आढळली, तर जराही दुर्लक्ष करु नका उच्च रक्तदाबासोबत लिव्हर डॅमेजची 5 लक्षणं आढळली, तर जराही दुर्लक्ष करु नका
हायब्लड प्रेशर ज्यास अलिकडे सायलेंट किलर म्हटले जाते. ब्लड प्रेशर केवळ हृदयावर परिमाण करत नाही. तर लिव्हरला देखील हळूहळू नुकसान...
पुरुषांसाठी खतरनाक आहेत हे खाद्यपदार्थ, जादा सेवनाने स्पर्म काऊंट घटते, अहवालात खुलासा
PHOTO – दगडूशेठ हलवाई गणपतीने मंडळाने साकारली पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती
मराठा आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? अंबादास दानवे यांचा सवाल
Pandharpur News – ज्येष्ठा गौरी आवाहननिमित्त श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला अलंकार परिधान
Latur News – मांजरा प्रकल्पातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू
भाजप मतचोरी करून निवडणूक निवडणुका जिंकू इच्छिते, उत्तर प्रदेशातही मतदार यादीत घोळ; संजय सिंह यांचा आरोप