परीक्षेसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पाच दिवसांच्या सुट्टीवरून ड्युटीवर परतल्यानंतर महाराष्ट्रातील जवानाचा जम्मू-कश्मीरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सुभाष अनिल दाते असे मरण पावलेल्या जवानाचे नाव आहे. सुभाष दाते हे महाराष्ट्रातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथील रहिवासी आहेत.
दाते सध्या जम्मू-कश्मीरमधील बीआरओत ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (डीईएस) म्हणून कार्यरत होते. राजपूरमध्ये आई आणि मामासोबत सुभाष यांचे बालपण गेले. बारावीनंतर आयटीआयचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर सुभाष यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला.
दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाने सुभाषला जम्मू-कश्मीरमध्ये बीआरओमध्ये ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून नियुक्त करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. आगामी परीक्षेची तयारी करण्यासाठी सुभाष पाच दिवसांची रजा घेऊन गावी गेले होते.
बुधवारी सुभाष यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तात्काळ तळेघर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी घोडेगाव येथे रेफर केले. दुर्दैवाने, उपचार मिळण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचे पार्थिव मंचर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर राजपूरमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List