Ratnagiri News – वाटद MIDC ला व्हॉट्सअपवर विरोध करणाऱ्या चाकरमान्यांना पोलीस ठाण्यातून बोलावणे, मुस्कटदाबी विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप
वाटद एमआयडीसीच्या विरोधातील लढा आता आणख तिव्र होताना दिसत आहे. पोलिसांच्या मुस्कटदाबीविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. गावकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही पोलील लक्ष ठेऊन आहेत. व्हॉट्सअप ग्रुपवर वाटत एमआयडीसीविरोधात बोलताच थेट खंडाळा पोलीस ठाण्यात गावकऱ्यांना फोन येऊ लागले आहेत. ग्रामस्थांचे शंका समाधान करण्याऐवजी मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वाटद एमआयडीसी विरोधात वातावरण पेटले असून जनसंवाद सभेच्या दिवशी विरोधकांनी काढलेल्या मोर्चानंतर वाटद एमआयडीसी रेटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वाटद एमआयडीसी विरोधात स्थानिक ग्रामस्थांसह चाकरमानी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी आंदोलनात उतरले आहेत. चाकरमानी गावकऱ्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर आपली मते मांडून एमआयडीसीला विरोध करत आहेत. एमआयडीसी विरोधात पोस्ट टाकणाऱ्या दोन चाकरमान्यांना जयगड पोलीस ठाण्यातून फोन आले आहेत. त्यांना पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
वाटद एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध असताना प्रशासनाने त्यांच्या शंकाचे निरसन करणे गरजेचे असताना थेट पोलीस ठाण्यातून बोलावणे येत असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. एकट्या-दुकट्याला जरी पोलिसांनी बोलावले असले तरी, शनिवारी त्यांच्यासोबत काही ग्रामस्थही पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List