बांग्लादेशी मॉडेलकडे हिंदुस्थानचे बनावट आधार आणि मतदान कार्ड, कोलकाता पोलिसांकडून अटक
बांग्लादेशी मॉडेलकडे पश्चिम बंगालच्या बनावट आधार आणि मतदार कार्ड आढळले. याप्रकरणी कोलकाता पोलिसांच्या अँटी राउड विभागाने मॉडेलला अटक केली आहे. शांता पॉल असे या मॉडेलचे नाव असून ती आधी एअरहोस्टेसची नोकरी करत होती. गेल्या 6 वर्षांपासून ती कोलकातामध्ये राहत होती. कोलकाता पोलिसांच्या पार्क स्ट्रीट पोलिस ठाण्यात मॉडेलविरुद्ध बीएनसीच्या कलम 336(3)/338/341/61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांता पॉल बिक्रमगढ येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. पोलिसांनी शाताला अटक करत तिच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान तिच्या नावाने जारी केलेले अनेक बांग्लादेशी पासपोर्ट, रीजेंट एअरवेज (बांग्लादेश) कर्मचारी कार्ड, ढाका माध्यमिक शिक्षण प्रवेशपत्र, भारतीय आधार कार्ड, भारतीय मतदार/एपीआयसी कार्ड, वेगवेगळ्या पत्त्यांचे रेशन कार्ड सापडले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. शांताला बनावट आधार-मतदार कार्ड कसे मिळाले? याबाबत तपास सुरू आहे.
आरोपी महिलेला अॅप कॅब व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पकडले. ती 2023 पासून जाधवपूरमधील विजयगड येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. अलीकडेच शांताविरुद्ध ठाकूरपुकुर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. शांता बांग्लादेशातील दोन प्रसिद्ध कंपन्यांसाठी मॉडेल देखील होती. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. अटक केलेल्या मॉडेलकडून बांग्लादेशी पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. पोलीस शांताची सखोल चौकशी करत आहेत. शांताच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या वैधतेबाबतही तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List