Health Tips – मासिक पाळीमध्ये 2 रुपयांचे हे फळ खायलाच हवे, वाचा
अलीकडे बहुतांशी महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता यासंदर्भात खूप सारे प्राॅब्लेम्स पाहायला मिळतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या खाण्यावरुनच आपल्या निरोगी आयुष्याची व्याख्या ठरते. निरोगी खाण्याबद्दल चर्चा होताना, फळे आणि भाज्या निश्चितच त्याचा एक भाग असतात. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली फळे, भाज्या याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत.
विशेषतः महिलांसंदर्भात बोलताना, निरोगी राहण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश केला पाहिजे. केळी महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यापासून ते मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करण्यापर्यंत, केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. महिलांनी दररोज एक केळं का खायला हवं यामागची कारणे जाणून घेऊया.
Health Tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, किचनमधील ‘या’ दोन वस्तू आहेत खूप महत्त्वाच्या
दररोज एक केळं खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळेल आणि अशक्तपणा दूर होईल.
दररोज 1 केळं आहारात समाविष्ट केल्यास, पचनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि पचन सुधारेल. गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त कमी होते आणि पोट सहज साफ होते.
केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन सी असते. केळीमुळे जळजळ कमी होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केळीमध्ये असलेले मॅग्नेशियम मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास अतिशय उपयुक्त मानले जाते.
Health Tips – शरीरावरील वाढती चरबी ठरु शकते ‘या’ आजारांचे कारण
उर्जा वाढविण्यासाठी केळीमध्ये असलेले कार्बोहायड्रेटस् हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी महिलांनी किमान एक केळं खाणं हे खूप गरजेचे आहे.
केळी खाल्ल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी होतो. हे गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन कमी करते.
केळीमध्ये व्हिटॅमिन बी6 असते. जर महिलांनी दररोज एक केळ खाल्ले तर पीएमएसच्या दिवसांमध्ये होणाऱ्या समस्या कमी होतील.
Health Tips – शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘हा’ ज्यूस प्यायलाच हवा, वाचा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List