‘हे’ भारतीय फळ ब्लूबेरीइतकेच पॉवरफुल, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल करते नियंत्रित

‘हे’ भारतीय फळ ब्लूबेरीइतकेच पॉवरफुल, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल करते नियंत्रित

उत्तर अमेरिकेतील ब्लूबेरी हे एक असे फळ आहे जे जगाच्या अनेक भागात त्यांची लागवड केली जाते आणि त्याचबरोबर भारतातील काही थंड ठिकाणीही ब्लूबेरीची लागवड केली जाते. आधुनिक जीवनशैलीत लोकांनी त्यांच्या आहारात परदेशी फळांना डाएटमध्ये समाविष्ट केले आहे, परंतु या परदेशी फळांव्यतिरिक्त अशी अनेक भारतीय फळे आहेत जी पॉवरफूल अँटिऑक्सिडंट्ससह पोषक तत्वांचा खजिना आहेत. ब्लूबेरीप्रमाणेच जांभूळ हे फळ पोषक तत्वांचे भांडार आहे. NCBI च्या मते, जांभूळमध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल, लोह, व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, म्हणून या फळांचा वापर आयुर्वेदातसुद्धा औषधे तयार करण्यासाठी वापरले जाते. जांभूळ हे फळ अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदेशीर आहे. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

जांभूळ हे फळ अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करता‍त. अशातच अनेकजण त्यांच्या रोजच्या नाश्त्यातध्ये ब्लूबेरीचे सेवन करतात. पण तुम्ही ब्लूबेरीऐवजी जांभूळ फळाचे सेवन देखील केल्यास आरोग्यासाठी परिपूर्ण ठरेल चला त्याचे फायदे जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यास उपयुक्त आहे

आजच्या काळा चयापचय विकारांशी संबंधित गंभीर समस्या खूप वाढल्या आहेत कारण बदलती जीवनशैली त्याचबरोबर बदलते आहार यामुळे चयापचय सिंड्रोम आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. यामुळे वजन वाढते आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढतो. एनसीबीआयच्या मते, संशोधनात असे आढळून आले आहे की जांभूळ लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्या टाळण्यास फायदेशीर ठरू शकते. तर तुम्ही जांभुळ या फळांचे आहारात समावेश करू शकतात.

हृदयासाठी फायदेशीर

आहार तज्ञ आणि वेलनेस कोच लव्हलीन कौर यांनी जांभळाचे फायदे सांगितले आहे. ब्लूबेरीऐवजी जांभळाचा आहारात समावेश कसा करावा आणि त्याचे तुमच्या आरोग्यावर कोणते फायदे होऊ शकतात याबद्दल सांगितले आहे. जांभुळ हे खरे बेरी आहे, कारण त्यात व्हिटॅमिन के असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lavleen Kaur (@dt.lavleen)

मधुमेह नियंत्रित ठेवते

पोषणतज्ञ लव्हलीन कौर सांगतात की जांभळाचे सेवन मधुमेहात देखील फायदेशीर आहे. साखर नियंत्रित करण्यासाठी जांभुळ हे एक उपयुक्त फळ आहे. पावसाळ्यात त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. खरं तर, त्यात व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

जांभूळ या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि त्यात असलेले व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला देखील फायदेशीर ठरते. हे फळ तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे. एकंदरीत जांभूळ हे एक उत्तम हंगामी फळ आहे जे तुमच्या आहाराचा भाग बनवले पाहिजे.

 

जांभळाची बी देखील फायदेशीर

जामुन हे एक फळ आहे जे कधीही खाऊ शकते आणि त्याच्या बिया देखील फायदेशीर आहेत. काहीजण जांभळाच्या बिया वाळवून पावडर बनवतात. या पावडरचा सेवन साखर नियंत्रित करण्यासाठी करतात. तसेच जांभळापासून चविष्ट पेय देखील बनवली जातात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;