बदाम असली आहेत की नकली? ‘या’ 5 उपायांनी लगेच करा खरी-खोटी तपासणी

बदाम असली आहेत की नकली? ‘या’ 5 उपायांनी लगेच करा खरी-खोटी तपासणी

बाजारातून सुका मेवा खरेदी करताना आपण हमखास बदाम घेतो, कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र, हल्ली बाजारात असली दिसणारे पण बनावट मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. हे बदाम पाहायला खर्‍या बादामासारखेच दिसतात, पण त्यांच्यात पोषणमूल्ये नसतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

त्यामुळे खरे आणि बनावट बदाम यामध्ये फरक ओळखणं अत्यावश्यक आहे. यासाठी काही सोपे घरगुती ट्रीक्स वापरता येतात, जे कोणत्याही एक्सपेरीमंटची शिवाय तुम्ही करू शकता.

पहिली आणि सोपी ट्रिक : बनावट बदाम ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते हातावर रगडून बघणे.जर बादामाच्या रगडल्यावर हातावर रंग आला, तर समजा ते बनावट आहेत. कारण खऱ्या बदामावर कोणतीही बाह्य रंगत असत नाही. ते रगडल्यावर कोणताही रंग निघत नाही.

दुसरी सोपी ट्रिक : बदाम खरे की खोटे हे ओळखण्यासाठी दुसरी सोपी पद्धत म्हणजे त्यांना पाण्यात टाकणे. खरे आणि ताजे बदाम पाण्यात लगेच बुडतात, तर जुने, खराब किंवा बनावट बदाम पाण्यावर तरंगतात. त्यामुळे खरेखुरे बादाम शोधण्यासाठी हा सहज आणि प्रभावी उपाय आहे.

तिसरी सोपी ट्रिक : बदाम फ्रेश आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक घरगुती पण वैज्ञानिक पद्धत म्हणजे ‘पेपर टेस्ट’. एक बदाम घ्या आणि तो साध्या पेपरमध्ये गुंडाळा. मग हलक्या हाताने त्याला दाबा. जर तो खरा बदाम असेल तर काही वेळात कागदावर तेलाचे डाग दिसू लागतील. बनावट बदाम मात्र तेल सोडत नाहीत आणि पेपर कोरडाच राहतो.

चौथी सोपी ट्रिक : बदाम विकत घेताना त्याच्या पॅकिंगवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे ते म्हणजे ब्रँडचे नाव, पोषणमूल्य, बेस्ट बिफोर तारीख, आणि उत्पादनाची माहिती नीट वाचा. अनोळखी किंवा स्थानिक अनब्रँडेड विक्रेत्यांकडून बदाम खरेदी टाळा. कारण नकली बदाम फक्त चव बिघडवतात असं नाही, तर ते आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात.

पाचवी सोपी ट्रिक : खऱ्या बदामामध्ये ताजा वास असतो आणि चव थोडीशी गोडसर वाटते. तर दुसरीकडे, बनावट किंवा खराब झालेल्या बदामांमध्ये गंधच नसतो किंवा सडलेल्या वस्तूसारखा वास येतो. चव कडवट, बासलेली किंवा कृत्रिम वाटते. हा फरक लक्षात घेऊन तुम्ही खऱ्या आणि नकली बदामामधील अंतर सहज ओळखू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

——————————————————————————————–

 

——————————————————————————————–

 

——————————————————————————————–

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;