Radhika Yadav – मुलीच्या कमाईवर जगतोय! असे म्हटल्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी टेनिसपटू राधिका यादवला झाडल्या गोळ्या

Radhika Yadav – मुलीच्या कमाईवर जगतोय! असे म्हटल्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी टेनिसपटू राधिका यादवला झाडल्या गोळ्या

हरयाणातील गुरुग्राममधील घटनेने हिंदुस्थानी क्रीडाविश्व चांगलेच हादरले आहे. राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. कौटुंबिक वादातून झालेली ही हत्या आता चांगलीच चर्चेत आलेली आहे. मुख्य म्हणजे आता या हत्येसंदर्भात नवीन कारण समोर आलेले आहे. राधिकाच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राधिकाच्या वडिलांनी कबूल केले आहे की, त्यांनी राधिकाला स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना पाठीत 3 गोळ्या झाडल्या. तिच्या काकांनी तिला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. असे सांगितले जात आहे की, टेनिस खेळताना राधिका यादवच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तिला तिचा सराव थांबवावा लागला होता. तसेच तिने टेनिस पूर्णपणे सोडण्याऐवजी, टेनिस अकादमी उघडली होती. राधिकाचे वडील गावी गेल्यानंतर त्यांना मुलीच्या पैशावर जगतोय असा टोमणा मारला होता. यामुळेच त्यांनी रागाच्या भरात राधिकाची हत्या केल्याचे आता उघड झालेले आहे.

राधिकाला तिच्या वडिलांनी गोळ्या झाडल्यानंतर, ती जागीच कोसळली होती. गंभीर अवस्थेत तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यात अपयश आले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठीही पाठवण्यात आला. तसेच गुह्याची माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पिता दीपक यादव याला अटक केली. राधिकावर गोळय़ा  झाडण्यात आल्या तेव्हा तिची आईसुद्धा घरात होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत