Nanded News – डिजिटल इंडियाच्या नावाखाली हजारो नागरिकांची फसवणूक, मुख्य आरोपीस अटक

Nanded News – डिजिटल इंडियाच्या नावाखाली हजारो नागरिकांची फसवणूक, मुख्य आरोपीस अटक

डिजिटल इंडियाच्या नावे ऑटो, लॅपटॉप, बेरोजगार भत्ता आदी योजनांसाठी अनुदान देण्याचे आमिष दाखवणार्‍या शिवांश कम्युनिकेशनच्या आरोपी विरेंद्रसिंह हजारी याला वजिराबाद पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

डिजिटल इंडिया महाराष्ट्र आणि केंद्रशासन मान्यताप्राप्त या नावाचा बोर्ड लावून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नावे योजनांचा लाभ देण्याचे आमिष दाखवून नांदेड जिल्ह्यातील हजारो नागरिकांकडून लाखो रुपये उकळणार्‍या ठकाविरुद्ध अखेर वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः लक्ष घालून सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश कम्युनिकेशन या कार्यालयामार्फत विरेंद्रसिंह हजारी याने 2024 पासून एका वर्तमानपत्रात जाहिरात देऊन विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल असे आमिष दाखवले होते. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा आणि ते कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून जाहिरात केली. बेरोजगारांना 95 टक्के अनुदान ऑटोसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित पाच टक्के रक्कम अर्जदारांनी ऑटो प्राप्तीच्या वेळी भरावी लागेल तसेच आरटीओ ऑफिस चालन, अर्ज करताना कार्यालयाची फीस भरावी लागेल. या व्यतिरिक्त कोणताही खर्च लागणार नाही, अशी जाहिरात दिली. त्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणून आधार कार्ड, राशन कार्ड, टीसीची मागणी करण्यात आली होती. जाहिरात आणि बॅनरबाजीनंतर नांदेड शहरातील हजारो नागरिकांनी या कार्यालयाकडे पैसे भरले होते. त्यांना वुमन्स अँड चाइल्ड डिपार्टमेंटची बनावट पावती देण्यात आली होती. काही दिवसानंतर योजनांचा लाभ मिळेल या आशेने पैसे भरणारे अनेक लोक तारासिंग मार्केट येथील कार्यालयास भेटी देत होते. त्यावेळी ऑटो या महिन्यात मिळेल, पुढच्या महिन्यात मिळेल तसेच वेगवेगळ्या कारणावरून त्यांना परत पाठवण्यात येत होते.

दरम्यान, महाराष्ट्र तसेच केंद्र शासनातील अनेक कार्यालयांची नावे घेऊन तसेच बनावट पावत्या करून हजारो नागरिकांची फसवणूक करण्यात आली. काही नागरिकांनी याबाबत शासकीय कार्यालयाकडे संपर्क साधला असता अशी कोणतीही योजना  संबंधित कार्यालयामार्फत सुरू नसल्याचे त्यांना सांगण्यात आले; मात्र शासकीय कार्यालयांच्या नावे फसवणूक सुरू असताना तसेच शासकीय कार्यालयांच्या बनावट पावत्या दिल्या जात असताना शासकीय अधिकारी मात्र या प्रकाराकडे डोळेझाकच करत होते. त्यामुळे नागरिकांची फसवणूक वाढत गेली. अखेर दोन वर्षानंतर का होईना या प्रकरणात नांदेड पोलीस अधीक्षकांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पैसे भरणारे अर्जदार शिवांश कम्युनिकेशन येथे चकरा मारत असताना त्यांना धमकावण्याचे प्रकारही पुढे आले आहेत. अशा या फसवणुकीबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडेही काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वजीराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वीरेंद्रसिंह हजारी याला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असून वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रारी अथवा या प्रकरणाबाबत अधिक माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक
बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने...
फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करतात; संजय राऊत यांचा घणाघात
डान्सबार चालवणारे मंत्री कॅबिनेटमध्ये घेता आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत नैतिकतेच्या गप्पा मारता, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा